मध्य महाराष्ट्रात २४ तासात पुर्व मोसमी पाऊस कोसळणार

    17-May-2022
Total Views |
 
 

pre mansoon 
 
 
 
 
पुणे : यावर्षी हवामान खात्याच्या अचूक अंदाजानुसार मान्सून अंदमानच्या किनारपट्टीवर लवकर धडकणार असून येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवा्यातील काही भागात तसेच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी वर मान्सून पुर्व पाऊस कोसळेल असे भाकित वेधशाळेने केले आहे.
 
 
 
येत्या २४ तासात बंगालच्या उपसागरात अंदमान येथे मान्सून धडकणार असल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 
 
याचाच परिणाम म्हणून हवामानात बदल होणार असल्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून पुर्व सरी कोसळतील असेही हवामान खात्याने नमूद केले आहे.
 
 
लातूर, परभणी, हिंगोली नांदेड या भागात तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार आहे.
 
 
तथापि दोन दिवस राज्यात काही भागात तापमानवाढ देखील होईल. येत्या काही दिवसात बहुतांश भागात तापमान वाढलेले असेल.