एनजीटी कडून पर्यावरण मजुरीला आव्हान देणारी याचिका रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2022   
Total Views |
CSM
 
 
मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रीय हरित लवादने (एनजीटी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीला आव्हान देणारी याचिका रद्द केली आहे. या आठवड्यात याबाबतचा निर्णय देण्यात आला. ही याचिका कोळी समाजातील एका नेत्याने २०१७ साली दाखल केली होती.
 
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होईल. त्याचबरोबर सागरी जैवविविधतेवर परिणाम होईल. आणि किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला २०१५ मध्ये पर्यावरण मंजुरी दिली होती.
 
“हा प्रकल्प वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे उभारण्यात येणार आहे. आणि सर्व पर्यावरणीय सुरक्षा उपायांनी युक्त आहे." असे याचिका फेटाळून लावताना, आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील विशेष एनजीटी खंडपीठ म्हणाले
@@AUTHORINFO_V1@@