गर्मी पासून दिल्लीला दिलासा,आज वादळाचा अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2022   
Total Views |
heatwave
 
 
नवी दिल्ली(प्रतिनिधी)  : हवामान खात्याने राजधानी दिल्लीत गडगडाटासह वादळाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज सकाळी दिल्लीवर ढगाळ आकाश आहे. ज्यामुळे तापमानाचा पारा काही अंशांनी खाली येऊ शकणार आहे. यामुळे दिल्ली वासियांना उष्णतेपासून तात्पुरता आराम मिळेल.
 
 
पंजाब आणि हरियाणावरील चक्रीवादळ मान्सून पूर्व क्रियाकलापांना प्रवृत्त करत आहे. यामुळे सोमवार दि.१६ आणि मंगळवार दि. १७ रोजी तीव्र उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल. हवामान विभागाने म्हटले आहे की सोमवारी दि.१६ रोजी राष्ट्रीय राजधानीत गडगडाटी वादळ किंवा धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी किमान तापमान ३०.८  अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी जास्त होते. तर, सापेक्ष आर्द्रता २२  टक्के आहे. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. काल दि.१५ रोजी राष्ट्रीय राजधानी आणि त्याच्या शेजारील भागात उष्णतेची लाट पसरली होती. वायव्य दिल्लीतील मुंगेशपूर येथे पारा ४९.२ अंश सेल्सिअस आणि शहराच्या नैऋत्य भागात नजफगढ येथे ४९.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.
@@AUTHORINFO_V1@@