_202205161713344507_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
कॅलिफोर्निया : दक्षिण कॅलिफोर्नियात जिनिव्हा प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये रविवारी १५ मे रोजी प्रार्थना सभेच्या दरम्यान गोळीबार झाला. लॉस अँजिलिसहून ८० किमी अंतरावर असलेल्या या चर्चमध्ये हल्ला झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. हल्लेखोराला प्रार्थना सभेच्या वेळी उपस्थित लोकांनी लगेचच ताब्यात घेतले. या घटनेत वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली. चर्चमध्ये रविवारी मोठ्या संख्येने लोक प्रार्थना सभेसाठी जमले होते.
प्रार्थना सभेच्यावेळी चर्चमध्ये उपस्थित असलेले काही लोक तैवानी होते, असा पोलिसांचा दावा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त लावला आहे. गोळीबार झालेल्या ठिकाणांचा पंचनामा केला आहे. तसेच सामान्य नागरिकांना घटनास्थळी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे काही काळ या भागात तणावपूर्ण परिस्थिती होती.
राज्यपाल गविन न्यूजम यांच्या कार्यालयाकडून निवेदनात म्हटले आहे की अधिका-यांनी “कोणालाही त्यांच्या प्रार्थनास्थळी जाण्याची भीती बाळगू नये. आमचे विचार पीडित समुदाय आणि या दुःखद घटनेने प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आहेत.” अमेरिकेत पाठच्या काही वर्षांपासून, दंगली वाढल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. अहवालानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेत गोळीबारच्या घटनांमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. ही ऐतिहासिक वाढ म्हणून वर्णन केले जात आहे, कारण गेल्या २५ वर्षांत २०२० मध्ये सर्वाधिक हत्या झाल्या आहेत.