नवी दिल्ली : जगावर कोसळलेल्या कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. अमेरिकेच्या पुढाकाराने भरलेल्या दुसऱ्या ग्लोबल व्हर्च्युअल कोविड समिट मध्ये मोदी बोलत आहे. WHO चे मान्यता दिलेल्या ४ लशींचे उत्पादन भारत करत असून ५ अब्ज डोसेसची निर्मिती करण्याची क्षमता भारत करत आहे असा दावा पंतप्रधानांनी केला. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात केला जात असून आतापर्यंत ९० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
जगात अजूनही कोरोना साथ थैमान घालत आहे. नव्याने कोरोना रुग्णाची संख्या जगभारत वाढायला लागली आहे. ज्या देशांकडे या साथीचा सामना करण्यासाठी पुरेशी क्षमता नाही अशा देशांना मोठ्या देशांनी मदत केली पाहिजे आणि भारत ती करत आहे असा दावा पंतप्रधानांनी या समिटमधील आपल्या भाषणात केला.