मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. १६१ पदांसाठी ही परीक्षा होणार असून संपूर्ण राज्यभरातून ३७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंट वरून ही घोषणा करण्यात आली आहे. सहाय्यक संचालक वित्त व सेवा, मुख्यधिकारी, राज्य उत्पादन शुल्क सहाय्यक आयुक्त यांसारख्या विविध पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. याबद्दलचे सविस्तर परिपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
राज्यभरातून लाखो तरुण - तरूणी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षा रखडलेल्याच होत्या पण कोरोना निर्बंध शिथिल झाल्यावर मात्र या प्रक्रियेस वेग आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी राजपत्रित आणि अराजपत्रित अशा दोन्ही गटांतील विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात.