‘सर्वांसाठी पाणी’ आणणार तरी कुठून?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2022   
Total Views |
 
  
WATER FOR ALL 
 
 
 
 
 
 
मुंबई महानगरपालिकेने शनिवारी ‘सर्वांसाठी पाणी’ योजना जाहीर केली खरी. पण, वस्तुस्थिती लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका सर्वांसाठी पाणी नेमके आणणार तरी कुठून, असाच प्रश्न उपस्थित होतो. त्यानिमित्ताने मुंबईतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि पाणीटंचाईच्या घटनांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
बईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एप्रिलमध्ये घोषित केले की, दि. १ मेपासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पालिकेकडून सर्वांना पाणीपुरवठ्याकरिता त्यांच्या घरात पाण्याची जोडणी देणार आहोत. त्यानंतर ७ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सगळ्यांना पाणी देण्याचे धोरण पालिकेने प्रथम २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात मांडले होते. आता हे धोरण मुंबईच्या नकाशावर नसलेल्या झोपडपट्ट्यांना, म्हणजेच बेकायदेशीर वस्त्यांनासुद्धा लागू केले जाणार आहे. ती वस्ती राज्य वा केंद्र सरकारी, रेल्वे, बीपीटी, विमानतळाच्या जागेवर असलेल्यांना खासगी वा ‘सीआरझेड’सारख्या अन्य ठिकाणी असली तरी पाण्याची जोडणी त्यांना माणुसकीच्या तत्त्वावरून दिली जाणार आहे. ही जलजोडणी देताना मात्र संबंधित यंत्रणांकडून पाण्याच्या जोडणीकरिता काही विरोधी धोरण नसायला हवे. “ती वस्ती १९६४ च्या आधीपासून अनधिकृत असली तरी आम्ही पाण्याकरिता कनेक्शन देऊ. या धोरणामधून पाण्याच्या अनधिकृत जोडणी व चोरीकरून केलेली जोडणी कमी होतील. शिवाय पाण्याची अवास्तव गळतीसुद्धा कमी होईल आणि जलवाहिनीमधील पाणी शुद्ध स्वरूपात राहील. हे धोरण लागू करताना कोणत्याही नागरिकांच्या काही सूचना असल्या तर त्यात बदल होऊ शकतो,” असे प्रतिपादन अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलारुसू यांनी व्यक्त केले.
 
मुंबई महापालिकेने २०१६ मध्ये पाण्याचा हिशोब खालीलप्रमाणे केला होता.
 
 
मुंबई महापालिका सध्या ३,८५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईकरांना पुरवित आहे. परंतु, मुंबईची पाण्याची मागणी ४,२५० दशलक्ष लीटर आहे. हे शुद्ध स्वरुपातील पिण्याचे पाणी मुंबईजवळील सुमारे २०० किमी अंतरावरील सात तलावांमधून, धरणांमधून पुरविले जाते. २०१५ मध्ये मुंबईची लोकसंख्या १३ दशलक्ष होती, जी २०४१ पर्यंत १७.२४ दशलक्ष होईल व पाण्याची मागणी दिवसाला ६,४२४ दशलक्ष लीटर होईल ती खाली दिलेल्या हिशोबाप्रमाणे.
 
 
झोपडपट्टी सोडून जी ७.९२ दशलक्ष लोकांची २०२१ मध्ये वस्ती आहे, ती ५२.३९ टक्के वाढेल व ती वस्ती २०४१ मध्ये १२.०७ दशलक्ष होईल.
झोपडपट्टीची वस्ती २०२१ मध्ये ५.२८ दशलक्ष आहे, ती २.१२ टक्के कमी होऊन २०४१ मध्ये ती ५.१७ दशलक्ष होईल.
 
 
औद्योगिक व व्यापारी कामासाठी असलेली २०२१ मधली पाण्याची गरज ४१.१७ टक्के वाढेल व ती २०४१ मध्ये ती रोजची ८५० दशलक्ष लीटरवरून १,२५० दशलक्ष लीटर होईल. मुंबईतील फिरती लोकसंख्या २०४१ मध्ये ५० टक्के वाढेल. २०२१ मधील त्यांची रोजची संख्या एक दशलक्षवरून ती २०४१ मध्ये १.५ दशलक्ष होईल व त्यांच्याकरिता रोज पाण्याची गरज ५० दशलक्ष लीटरवरून ७५ दशलक्ष लीटर होईल. वरील हिशोबावरून मुंबईची २०४१ मधील पाण्याची गरज ६,४२४ दशलक्ष लीटर प्रतिदिन दाखविले आहे.पण बरोबरच्या हिशोबाप्रमाणे पाण्याची गरज फक्त ३३४१ दशलक्ष लीटर प्रतिदिन येते.
 
 

पाणी गळती व २४ तास पाणीपुरवठ्याचे प्रकल्प
 
 
सध्याचा मुंबईचा पाणीपुरवठा ३,८५० दशलक्ष लीटर प्रतिदिन सुरू आहे. मुंबईत एवढे पाणी वापरले जाते, पण पाण्याची गरज फक्त २,९७० दशलक्ष लीटर प्रतिदिन आहे. म्हणजे ९०९ दशलक्ष लीटर प्रतिदिन हे गळतीचे आहे. ते साधारणपणे ३० टक्के येते. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालायला हवे व गळती कमी करायला हवी.
 
 
मुंबई महापालिकेने पाणीगळतीचा प्रकल्प आणि २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प गुंडाळून टाकला आहे. हा प्रकल्प २०१४ मध्ये सुरु केला होता. त्या प्रकल्पाची किंमत २७५ कोटी होती. फक्त २० टक्के काम पूर्ण झाले. पाणी गळती रोखणे खर्चिक होत आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. नासाडी रोखण्याची पालिकेची इच्छा नाही.
 
 
मुंबईतील पाण्याची गळती, टंचाई व अशुद्ध पाण्याची काही ठिकाणची माहिती खालीलप्रमाणे आहे- २७ एप्रिल - अंधेरी ‘आरटीओ’ भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक ७०० ते ८०० नागरिकांना विविध आजारांची लागण झाली आहे.
 
 
- १४ एप्रिल - कुलाब्यात पाणीटंचाई - काही दिवसापूर्वी बॅकबे बेस्ट बस डेपो येथे १५० मिमी व्यासाची जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली होती. तरीही काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे आढळले. जुन्या गंजलेल्या जलवाहिन्यांमुळे बहुतांश भागामध्ये कमी दाबाने तर काही भागात पाणीपुरवठा होत नाही. रहिवाशांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. ही समस्या पालिकेला अजून दूर करता आलेली नाही.
 
 
- १५ एप्रिल- अंधेरी, वडाळा, गोरेगाव, दहिसर, सायन कोळीवाडासह अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार काँग्रेसने पालिकेकडे केली आहे. डॉ. आंबेडकर नगर, शिवशक्ती नगर, धोबीघाट परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते आहे. नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
 
 
- ८ एप्रिल- पाणी समस्या अधिक गंभीर - महात्मा फुले नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तेथे अनेकदा टँकरने पाणी पुरविले जात आहे.
 
 
- ७ एप्रिल - चिंचपोकळीत पाणीगळती होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना जलवाहिनीला धक्का लागला तेव्हापासून गळती सुरू आहे.
 
 
- २३ मार्च - कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडजवळच्या पाण्याचे परीक्षण केले तेव्हा प्रदूषित पाण्यामुळे जलचरांवर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. मिठागरांवरही दुष्परिणाम होत आहे.
 
 
- ११ मार्च- दुरुस्तीच्या नावाखाली मुख्य जलवाहिनी बंद केल्याने गेल्या १५ दिवसांपासून कुर्ला (प) संजय नगर परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे.
 
 
- ८ फेब्रुवारी- मालाडमधील कुरार गावामध्ये अर्धा तासच पाणी मिळत आहे. सहा महिन्यांपासून रहिवासी त्रस्त झाले आहेत.
 
 
- २१ मार्च - आरे कॉलनीतील नागरिक पाण्यासाठी वंचित झाले आहेत. कित्येक वर्षी त्यांना पाणी मिळत नाही. इथल्या नगरसेविका या पाणीटंचाईकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार त्या नागरिकांनी केली आहे.
 
 
- १९ मार्च- वर्सोवा कोळीवाड्यामधील शिवगल्ली परिसरातील कोळी बांधवांनी त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी झुरावे लागत आहे, अशी तक्रार केली आहे. नळाला पाणी नसताना १५ ते २० हजार पाण्याचे बिल येत असल्याचे तक्रारीत सांगितले आहे.
 
 
- १२ मार्च- महापालिकेने केलेल्या पाहणीत भिवंडी, पोगाव भागात संरक्षक भिंती तोडून झोपडपट्टीतील लोक मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी करत आहेत. मुंबईच्या रोजच्या ३,८५० दशलक्ष लीटर पाण्यापैकी २० ते ३० टक्के पाणी चोरीला जाते.
 
 
- १५ नोव्हेंबर २०२१ - काजूपाड्यातील पाणीप्रश्न तापला आहे. बोरिवलीत पाणीटंचाईच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन सुरू आहे.
 
 
ठाणे शहर -
 
- २५ मार्च २०२२ - ठाण्यातील पाणीटंचाईत शेकडो विहिरी उपेक्षित झाल्या आहेत. निम्मे तलाव गायब झाले आहेत, विहिरीही मरणपंथाला आल्या आहेत पण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
 
 
- २५ मार्च २०२२- ठाण्यात पाणी थेंब थेंब व घोटाळे मात्र धो धो होत आहेत. आ. संजय केळकर यांच्याकडून पालिकेतील सत्ताधार्‍यांची ‘पोलखोल’ झाली आहे.
 
 
- २१ मार्च २०२२ - पाणी समस्या हाताळण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची उदासीनता दिसत आहे. पाण्याची समस्या अजूनही ‘जैसे थे’ आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘टास्क फोर्स’ स्थापन केला.
 
 
- २१ मार्च २०२२ - ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले. ‘स्टेम’कडून होणार्‍या पुरवठ्यामध्ये दहा दशलक्ष लीटरची कपात झाली आहे.
 
 
- ७ एप्रिल २०२२ - ठाणे पालिकेसमोर मडकी फोडून दिवावासीयांचा पाण्यासाठी संताप होत आहे. भाजपच्या ‘पाणी हक्क मोर्चा’ने पालिका परिसर दुमदुमला होता.
 
 
- ३१ डिसेंबर २०२१ - कोट्यवधी खर्चूनही कळवा-मुंब्र्यात पाणीटंचाई होत आहे. महासभेतील पठाणी राड्यानंतर पाणीपुरवठ्याच्या ‘रिमॉडेलिंग योजने’च्या चौकशीचा फार्स होत आहे.
 
 
अशाच तर्‍हेने पाणीटंचाई व अशुद्ध पाणीप्रश्न नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि राज्यातील अन्य ठिकाणी सध्या कळीचा ठरला आहे. त्याची स्थानिक प्रशासनाने वेळीच दखल घ्यायला हवी.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@