राजस्थान महाराष्ट्राच्या वाटेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2022   
Total Views |

mahesh
 
 
 
राजस्थान सरकारचे जलसंपदामंत्री डॉ. महेश जोशी यांचे सुपुत्र रोहित जोशी यांच्यावर दिल्लीत बलात्काराची तक्रार दाखल झाली असून, त्याविषयीचा तपास आता दिल्ली पोलीस करणार आहेत. रोहित जोशी यांना अटक होण्याची शक्यतादेखील आहे. एका २३ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रोहित जोशी यांच्यावर लावण्यात आला असून, राजस्थान सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, ‘माझे वडील मंत्री आहे, कुणी काहीही बिघडवू शकत नाही,’ असे रोहित बोलत असल्याचेही पीडित मुलीने सांगितले. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांची सत्तेची मग्रूरी स्पष्ट दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील राजकीय आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे.
आधी करौली आणि नंतर जोधपूरमध्ये हिंदूंवर हल्ले झाले. तसेच, अलवरमध्ये हिंदू मंदिरांवर बुलडोझर चालविण्याचे पापही राजस्थानच्या काँग्रेस सरकारने केले. राजस्थानमधील अलवर येथील हिंदू मंदिरावर बुलडोझर चालवून मूर्ती हटविण्यात आल्या. त्यावर एका नामांकित वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार अमन चोपडा यांनी चॅनलवर चर्चा आयोजित केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, जोधपूर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या सुपुत्रावर बलात्काराचे आरोप होत असताना इकडे मात्र, अलवरमधील हिंदू मंदिरांवरील बुलडोझर चालवल्यानंतर त्याचे सत्य सर्वांसमोर आणले म्हणून अमन चोपडा यांच्यावर कारवाईसाठी सरकार हात धुवून मागे लागले. त्यांच्यावर चक्क धार्मिक भडकविण्याचे आरोप लावण्यात आले.
इकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार राजस्थान सरकारपेक्षा काही कमी नाही. सध्याचे राजस्थान सरकारचे कारनामे ठाकरे सरकारशी मिळतेजुळतेच आहेत. इकडे ठाकरे सरकारच्या विरोधात काही बोललं की, त्या व्यक्तीच्या घरी अवैध अतिक्रमण असल्याचा अचानक जावईशोध लावला जातो. नोटिसा पाठवून अटक केली जाते. आधी कंगना, अर्नब आणि आता राण दाम्पत्य. सत्तेच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा खटाटोप महाराष्ट्राबरोबरच आता राजस्थानमध्येही जोर पकडू लागला आहे. सूडापोटी सुरू झालेलं राजकारण महाराष्ट्राबरोबरच राजस्थानी जनतेलाही आणखी खाईत सोटत आहे.
 
 
 
 
शरद पवारांचा गुगली ‘बाण’
गलीबाज राजकारणासाठी परिचित असलेल्या शरद पवार यांनी मंगळवारी नवी गुगली टाकली. गहन विचार करणार्‍या विचारवंतासारखे वक्तव्य करण्यात पवारांचा हात कोणीही धरू शकत नाही. तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू असताना त्यात शरद पवारांनी गुगली टाकून शांत पाण्याला उगाच ढवळण्याचा प्रयत्न केला. “येणार्‍या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटत आहे की, निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी, तर काही जणांनी एकट्याने निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे,” असे वक्तव्य शरद पवारांनी केल्याने आता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीचे नेतेही संभ्रमात सापडले आहेत. “या मतप्रवाहांवर पक्षात सविस्तर चर्चेनंतर येत्या काळात निर्णय घेतला जाईल,” असे पवारांनी स्पष्ट केले.
 
 
त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांत निवडणुका घ्या, असे म्हटले नसून निवडणुकीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करा, असे न्यायालयाने सांगितल्याचा नवा शोधही पवार लावायला विसरले नाहीत. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीवर रोज नवनवीन संकटांचा भडीमार होत आहे. भ्रष्टाचाराची परिसीमा ओलांडल्यानंतर आता राज्यात सूड घेण्याचे सत्र सुरू आहे. विश्वप्रवक्ते मात्र, आमचं सरकार पाच-दहा नव्हे, तर चक्क २५ वर्षं टिकणार असल्याच्या डरकाळ्या फोडतात. पवार साहेब मार्गदर्शक असल्याचेही सांगतात. मग पवारांना पक्षातील समजलेल्या दोन मतप्रवाहांचा नेमका अर्थ का बरे कळू नये? राज्यात महादगाफटकावादी सरकार स्थापन करून त्याला महाविकास आघाडी, असे गोंडस नाव देण्याचा प्रयत्न करत एकतेच्या आणाभाका आणि शपथा घेऊनही पवारांना दोन मतप्रवाहांची आठवण का होते, याचे रहस्य मात्र उलगडत नाही.
 
 
अशा प्रकारच्या गुगल्या टाकून पवारांनी शिवसेनेला सळो की पळो करून ठेवले आहे. मंत्री राष्ट्रवादीचे आत जात असतानाही शिवसेनेच्या माथी बदनामीचा टिळा लावला जात आहे. सत्तेत एकत्र असतानाही पवारांना एकत्र लढण्याची इतकी हिंमत येणे जरा आश्चर्यकारक आहे. माढातून घेतलेली माघार, पार्थ पवारांचा लाजीरवाणा पराभव ते सुप्रिया सुळेंचे मागील लोकसभेला घटलेले मताधिक्य अशा उदाहरणांतून नंतर लबाडपणा करून मिळवलेल्या सत्तेतही पुन्हा लबाडपणा करणे हे न समजण्यापलीकडचे रहस्य आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@