"असली- नकली हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या ठाकरे सरकारनं उत्तर द्यावं"

गजानन काळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    10-May-2022
Total Views |

gk
 
 
 
 
 
मुंबई : "महाराष्ट्र सरकारने नोटीसा पाठवून जे शक्य झाले नाही ते, मनसेच्या हनुमान चालीसा आंदोलनाने शक्य करून दाखविले आहे. मनसेने मशिदींवरच्या भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासावर मशिदींसमोर तितक्याच जोरात हनुमान चालीसा लावण्याचे आंदोलन केले होते त्याचे यश आत्ता दिसत आहे.
 
 
 
मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी झालेला असून काही ठिकाणी भोंगे खाली उतरविण्यात चालायचे दिसून येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी फक्त मशिदींवरच्या भोंग्यांचा ११४० मशिदींपैकी आलेल्या अर्जांना फक्त ९५० मशिदींना भोंगे वाजविण्याची परवानगी देण्यात आली होती.
 
 
 
मात्र २४०० मंदिरांपैकी फक्त २४ मंदिरांनाच भोंगे वाजविण्याची परवानगी देण्यात आली असा दुजाभाव का? असली आणि नकली हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या ठाकरे सरकार याचे उत्तरे देतील का? या वर प्रकाश टाकतील का? हिंदूंचे नक्की कोण नुकसान करीत आहे? अशा प्रकारचे सवाल गजानन काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विचारले आहेत. आता यावर ठाकरे सरकार काय उत्तर देतील हे त्यांच्या येत्या १४ तारखेला होणाऱ्या सभेत कळेल.