६०० वर्षांपूर्वी इस्लामच्या आगीत जळलेले काश्मीरच्या मंदिरात घुमला मंत्रोच्चार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2022   
Total Views |
mt
 
 
 
नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिरात झालेल्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इस्लामिक दहशतवाद्यांचे अत्याचार सहन करणाऱ्या मंदिराप्रती लोकांची श्रद्धा किती शतकांनंतरही कायम आहे, हे या माध्यमातून समोर आले. परंतु यावर ए.एस.आय ने आक्षेप घेतला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग शहरातील आठव्या शतकातील मार्तंड सूर्य मंदिरात अनेक वर्षांनी भाविकांनी 'हर हर महादेव'चा जयघोष केला. यानंतर राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही नवग्रह अष्टमंगलम हवन आणि पूजेत भाग घेतला होता. याचे फोटोही सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. आता त्याच पूजेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच या मंदिरात पूजा करण्यावर राज्यपालांनी आक्षेप व्यक्त केला आहे. एएसआयने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून हा मुद्दा उचलून धरला आहे.
नियमांनुसार, एएसआयने संरक्षित केलेल्या ठिकाणी पूजा करण्यापूर्वी राज्यपालांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. पण तसे झाले नाही. या पूजेसाठी इतर राज्यातून पुजारी बोलावण्यात आले होत असे एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले विशेष म्हणजे, प्राचीन स्मारकांवरील कायद्यानुसार केंद्र सरकारच्या लेखी परवानगीशिवाय संरक्षित स्मारकांमध्ये सभा, जेवण समारंभ, मनोरंजन किंवा इतर काहीही करता येत नाही यावर ए.एस.आयचा आक्षेप आहे. मग परवानगी न घेता तिथे पूजा का आयोजित करण्यात आली असा सवाल जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. एएसआयचे म्हणणे आहे की मंदिराच्या बाहेर पूजा केली जात असली तरीही ती नियमांचे उल्लंघन आहे.
८ मे रोजी काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मनोज सिन्हा यांनी याला दैवी अनुभव म्हटले होते. तसेच आपल्या ट्विटमध्ये, मंदिरातील पूजेशी संबंधित चित्रे शेअर करताना, त्यांनी लिहिले, "सरकार सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या प्राचीन स्थळांचे संरक्षण आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे,त्याचसोबत या सुंदर भूमीला शांती, सुख आणि समृद्धी लाभो अशी इच्छा."
@@AUTHORINFO_V1@@