वॉशिंग्टन : अमेरिकेच्या महिला खासदार इल्हान उमर यांनी भारत विरोधात विधान केल्याने संतप्त व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारला अल्पसंख्याकविरोधी म्हटले. भारताविरोधात बोलताना त्यांनी आरोप केला की, ”देशात मुस्लीम अल्पसंख्याकांविरोधात मोठी मोहीम चालवली जात आहे.”
उमर यांनी बायडन प्रशासनाच्या उपपरराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांना प्रश्न केला की, ”अमेरिकन सरकार भारताचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एका मुक्त आणि खुल्या प्रदेशाला चालना देण्यासाठी कसे समर्थन करत आहे. ‘अमेरिकन काँग्रेस वुमन’नेही विविध देशांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करून हा ऐतिहासिक अन्याय आहे,” असे म्हटले आहे.
भारत सरकारने मुस्लीम असणे हा गुन्हा ठरवला
उमर यांनी आरोप केला की, "भारतात मुस्लीम असणे हा गुन्हा ठरवत आहे. केंद्र सरकार मुस्लीम अल्पसंख्याकांविरुद्ध करत असलेल्या कारवाईवर बाहेरून टीका करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल,“ असा सवाल त्यांनी केला.
अमेरिकेने आपल्या साथीदारांचे दुर्गुणही पाहावेत
अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री शर्मन यांनी उमर यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मी सहमत आहे की, (बायडेन) प्रशासनाने या जगातील प्रत्येक धर्म, प्रत्येक जात, प्रत्येक वंश, विविधतेच्या प्रत्येक गुणवत्तेच्या समर्थनासाठी उभे राहिले पाहिजे.
उमर यांनी त्यांचे बोलणे खोडत म्हटले की, “मला आशा आहे. आपण केवळ आपल्याच नव्हे, तर आपल्या सहकार्यांच्या वाईट गोष्टींविरुद्ध उभे राहण्याची सवय लावू. बायडेन प्रशासन मानवाधिकारांसाठी मोदी सरकारवर टीका करणे का टाळत आहे,” असेही उमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.