मुंबई : सहा महिन्यांपासून न्याय हक्कांच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमांचा बांध अखेर फुटला. महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी धडक देत मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पल भिरकावत आंदोलन सुरू केले.
पवार स्वतःला महाविकास आघाडीचे शिल्पकार समजतात, राजकारणातील चाणाक्य मानतात. एसटी संपाबद्दल पवारांनी कधीही खुलेपणाने प्रतिक्रीया दिली नाही. शंभरहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. एसटी संपाबद्दल न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. मात्र, इतक्या वेळेत पवारांनी कधीही तोडगा काढला नाही. उलट मंत्री अनिल परब सातत्याने येऊन कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या धमक्या देत आहेत. याबद्दल संताप व्यक्त करत आंदोलकांनी शरद पवारांचा जोरदार निषेध व्यक्त केला.