नीतेश राणेंचे आयुक्तांना पत्र! सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल, अशी पद्धती अवलंबू नका

    08-Apr-2022
Total Views | 94

uddhav




मुंबई : शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल, अशी पूरक पद्धती अवलंबू नका, असे खरमरीत पत्र आमदार नीतेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना लिहीले आहे. मुंबई महापालिकेतील एकूण १२३ प्रलंबित प्रस्तावांबद्दल अवैधता आढळत असेल तर संपूर्णपणे प्रक्रीया रद्द करावी, अशी मागणी राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.


नीतेश राणे म्हणाले, "मुंबई महापालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे. महापालिका संपुष्टात आल्याने यापूर्वीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेले परंतु समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे कामकाज पहाणारे विमल अगरवाल यांची कंत्राटदारांशी बोलणी फिस्कटल्याने काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाही,असे एकूण १२३ प्रस्ताव होते."

"हे प्रस्ताव मंजूर करणे हे आता प्रशासकाच्या अखत्यारित आहेत. तथापि आपण यावर ठोस निर्णय घेताना दिसला नाही. भाजपने नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र टीका केल्यानंतर आपण २५ दिवसांनी नालेसफाई आणि चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव समंत केले. त्यानंतर बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी आठ प्रस्तावांना मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. परंतु आपण स्वत: आयुक्त आहात आणि प्रशासकही आपणच आहात.
स्थायी समितीने बोलणी फिसकटलेले प्रस्ताव आपण निवडक पद्घतीने मंजूर करत आहात त्यामुळे मागे सत्तेत असणाऱ्या भ्रष्टाचारी सेनेचा आपल्यावर दबाव तर नाही ना अशी आमची धारणा होत आहे आणि तरीही काही निवडक प्रस्तावांनाच आपण मान्यता देण्याच्या आपल्या कार्यपद्धतीमुळे आपली प्रतिमासुद्धा मलीन होत आहे.", असेही ते म्हणाले.


सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल, अशी कार्यपद्धती अवलंबू नका!


मुंबई महापालिकेतील प्रलंबीत १२३ प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर महापालिका आयुक्तांनी हे प्रस्ताव संपूर्णपणे नामंजूर करावेत. मात्र, कुठल्या परिस्थितीत निवडक प्रस्तावांना मान्यता देऊन मागील सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121