श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची गुरुवार, दि. ७ एप्रिल रोजी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली. जम्मू-काश्मीर बँकेच्या माध्यमातून जमीन खरेदी केल्याप्रकरणी ओमर अब्दुल्ला यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ही इमारत १२ वर्षांपूर्वी विकत घेतली असल्याची माहिती आहे. ईडीने या वर्षाच्या सुरुवातीला या प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी ‘ईडी’ने ओमर अब्दुल्ला यांची चौकशी केली.