महात्मा फुले नगर, भांडुपमध्ये पेटले पाण्याचे राजकारण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2022   
Total Views |
 
 
water
 
 
मुंबई : भांडुप येथील महात्मा फुले नगरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अत्ंयत कमी दाबाने पाणी येते. आजूबाजूच्या परिसरातही पाणी वितरणाची समस्या आहे. आता तर महात्मा फुले नगर भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नगरसेविका जागृती पाटील तसेच, युवा मोर्चा ईशान्य मुंबईचे महामंत्री कौशिक पाटील यांनी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल स्थानिकांचे म्हणणे आहे की, बर्‍याचदा निवडणूक जवळ आली की, राजकीय खेळी म्हणून अशी पाण्याची टंचाई निर्माण केली जाते.
 
 
पाण्याची टंचाई भासली की, वस्त्याच्या वस्त्या नगरसेवकाकडे धाव घेतात. नगरसेवक जर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचा असेल, तर तो तत्काळ पाण्याची समस्या सोडवतो. त्यामुळे वस्तीवाल्यांना तो नगरसेवक आपला तारणहार वाटतो. दुसरीकडे जर नगरसेवक महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचा नसेल, तर त्या नगरसेवकाला त्रास देण्यासाठी हेच शस्त्र महानगरपालिकेतील सत्ताधारी वापरतात. भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सध्या महानगरपालिकेत सत्ताधारी असलेले लोक महानगरपालिकेला हाताशी धरून, असे राजकारण भाजपच्या नगरसेवकांसोबत करत आहेत. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून इतर पक्षातले इच्छुक उमेदवार भाजपच्या नगरसेविकेने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. चमकोगिरी करतात. त्यातून ते त्यांचा उथळपणा आणि जनतेबद्दलची असंवेदनशीलता दाखवतात.
 
 
महापालिकेकडून माहिती मिळत नाही
महात्मा फुले नगरात 90 टक्के नागरिक वंचित कष्टकरी समाजातील आहेत. आमचे हातावरील पोट आहे. गेले दोन महिने कामधंदे सोडून पाण्यासाठी आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दोन महिन्यापूर्वी या समस्येबद्दल भाजपच्या नगरसेविका जागृती पाटील तसेच भाजप पदाधिकारी कौशिक पाटील यांच्याकडे संपर्क केला होता. त्यावेळी समस्येची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी आमच्या वस्तीत बोरवेल बांधली होती. त्यामुळे वस्तीला थोडा दिलासा मिळाला. याबद्दल महानगरपालिकेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीच खात्रीलायक माहिती मिळत नाही.
 
 
संजय मुख्यदल, कार्याध्यक्ष, रिपाइं, ईशान्य मुंबई
@@AUTHORINFO_V1@@