नरेंद्र पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2022   
Total Views |
 
narendra patil
 
 
 
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच या संदर्भात घोषणा केली असून नरेंद्र पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
 
 
 
दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी माझी निवड केल्याबद्दल मी आमचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानत तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मराठा, बहुजन तरुणांसाठी व माथाडी कामगारांच्या उद्धारासाठी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून अथक परिश्रम घेईल,' अशी ग्वाही देखील नरेंद्र पाटील यांनीं यावेळी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@