मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मशिदीवर भोंगे वाजत असतील तर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा लावा असे मनसे कार्यकर्त्यांना सागितले होते. या आदेशानंतर लगेचच घाटकोपरमधील मनसे कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. घाटकोपरमधील चांदिवलीचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांच्या शाखेवर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा लावली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतरच हे केले असल्याचे भानुशाली यांनी सांगितले आहे.
दरम्यान २ एप्रिल रोजी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी "माझा कुठल्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही पण मशिदींवरचे भोंगे उतरावावेच लागतील नाहीतर ज्या मशिदीबाहेर भोंगे लागलेले असतील त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून तुम्ही हनुमान चालीसा लावा" असा आदेश मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिला होता.