मुंबई : "राष्ट्रवादीने मुळात आधी स्वतःचा इतिहास तपासून घेतला पाहिजे. २०१९ चा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्रातली जनता अजून विसरलेली नाही. त्यांनंतर राष्ट्रवादीने काय केलं तर थेट शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसली. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवर टीका करण्याआधी आधी स्वतःचा चेहरा एकदा आरशात तपसून घ्यावा." असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी (दि. २ एप्रिल) शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या भाषणावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
"राष्ट्रवादीने आधी स्वतःचा इतिहास तपासून घेतला पाहिजे. ईशरत जहाला पाठिंबा देणारे, दाऊद ची संपत्ती विकत घेणारे, याकुब मेमनच्या फाशीला विरोध करणारे, दाऊदच्या माणसांना स्वतःच्या विमानातनं फिरवणारे हे सर्व राष्ट्रद्रोहीच आहेत.", असेही ते पुढे म्हणाले.