पंतप्रधान पुढील आठवड्यात जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2022   
Total Views |
NM
 
 
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते ४ मे दरम्यान जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षातील पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही नेते भारत-जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स (आयजीसी) च्या सहाव्या आवृत्तीला उपस्थित राहतील. चॅन्सेलर स्कोल्झ यांच्यासह पंतप्रधान मोदी प्रथमच चर्चा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आणि चांसलर स्कॉल्झ संयुक्तपणे एका व्यावसायिक कार्यक्रमाला संबोधित करतील. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी जर्मनीत राहणाऱ्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत.
डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कोपनहेगनला अधिकृत भेट देणार आहेत. डेन्मार्क आयोजित दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहेत. भारत आणि डेन्मार्कमधील हरित धोरणात्मक भागीदारी ही अशा प्रकारची पहिलीच भागीदारी आहे. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची तसेच बहुआयामी सहकार्याचा आणखी विस्तार करण्याचे मार्ग तपासण्याची संधी मिळेल. या भेटीदरम्यान ते भारत-डेन्मार्क बिझनेस फोरममध्ये सहभागी होतील आणि भारतीय डायस्पोरा सदस्यांनाही संबोधित करतील.
पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहेत. अध्यक्षपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांचा पराभव करून मॅक्रॉन यांची सोमवारी सर्वोच्च पदावर पुन्हा निवड झाली आहे. भारत आणि फ्रान्स या वर्षी त्यांच्या राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करत आहेत आणि दोन्ही नेत्यांमधील भेटीमुळे धोरणात्मक भागीदारीचा अधिक महत्त्वाकांक्षी अजेंडा निश्चित केला जाईल.
@@AUTHORINFO_V1@@