मुंबईच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त पदी गीता रविचंद्रन

    27-Apr-2022
Total Views |
 
 
 
new chief income taxh
 
 
 
 

मुंबई: १९८७ च्या तुकडीच्या ‘आय.आर.एस’ (भारतीय महसूल सेवा) अधिकारी गीता रविचंद्रन यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, गीता रविचंद्रन यांच्याकडे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विभागांच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदाचा कार्यभार होता. त्यांनी चेन्नई, मुंबई, नागपूर आणि बंगळुरूसह देशाच्या विविध भागात सेवा बजावली आहे.
 
 
त्यांच्या ३४ वर्षांच्या उत्कृष्ट कारकिर्दीत त्यांनी मूल्यांकन, शोध मूल्यांकन, न्यायाधिकरण प्रतिनिधी, टीडीएस, अन्वेषण विभाग आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.