‘समृद्धी’ महामार्गावरील ‘वाईल्डलाईफ ओव्हरपास’चे नुकसान

    27-Apr-2022   
Total Views | 307

op
 
 
मुंबई(प्रतिनिधी): मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गवरील ‘वाईल्डलाईफ ओव्हरपास’चे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याबाबत माहिती दिली आहे.
 
 
नागपूरजवळील सुरुवातीच्या ठिकाणापासून 15 किमी अंतरावर हा अपघात झाला. मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या 700 किमी लांबीच्या द्रुतगती मार्गावर एकूण आठ वन्यजीव ‘ओव्हरपास’ आणि 22 वन्यजीव ‘अंडरपास’ तयार करण्यात येणार आहेत. हा ‘समृद्धी’ महामार्ग बोर व्याघ्र प्रकल्प आणि इतर अनेक पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागांमधून जातो. एक्सप्रेस-वेचा एकूण 117 किमीचा पट्टा हा अनेक वन्यजीव अधिवास, व्याघ्र कॉरिडोर आणि तीन अभयारण्यांमधील इको-सेन्सिटिव्ह झोन (एडन) मधून जातो. तानसा, (हरिश्चंद्रगड अभयारण्य), काटेपूर्णा आणि कारंजा सोहोळ यांना ’वन्यजीव-केंद्रित क्षेत्र’ म्हंटले आहे. या ‘एक्सप्रेस-वे’वर आठ वन्यजीव ‘ओव्हरपास आणि 17 वन्यजीव ‘अंडरपास’सह 25 वन्यजीव शमन संरचना असतील. याशिवाय, वन्यजीव-केंद्रित क्षेत्राच्या बाहेरील भागात दोन वन्यजीव ओव्हरपासचीही योजना करण्यात आली आहे.
 
 
2015साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे काम 2017मध्ये सुरू करण्यात आले होते. नुकसान भरून काढण्यासाठी आता सुमारे 45 दिवस लागतील आणि जूनच्या अखेरीस ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता ऑगस्टपर्यंत पहिला आणि दुसरा टप्पा एकत्र सुरू करण्याचा आमचा विचार आहे. याचा अर्थ नागपूर ते शिर्डी हा मार्ग ऑगस्टपर्यंत खुला होईल. असे ’एमएसआरडीसी’च्या अधिकार्‍यांनी सांगितले. नागपूर ते मुंबई दरम्यानचा संपूर्ण भाग डिसेंबर 2022पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट होते. पण, ‘कोविड-19’मुळे अनेक विलंबांमुळे, 2023च्या मध्यापर्यंत संपूर्ण रस्ता खुला होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, नुकतीच वन्यजीव ओव्हरपासची बांधकामाधीन कमान कोसळल्याने एका मजुराचा मृत्यूही झाला आहे. आता प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. या महामार्गाचे कामे 2017 मध्ये सुरू करण्यात आले होते. तत्कालीन सरकारच्या काळात हे काम वेगाने सुरू होते.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121