मुंबई: ‘रायगड सहकारी बँक लिमिटेड’ मुख्यालय व शाखा स्थलांतर सोहळा विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या अध्यक्षतेत मंगळवार सायंकाळी ७ वाजता दुकान नं. ५, ६ व ७, अनंत निवास, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पूर्व), येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ‘रायगड सहकारी बॅक लि.’चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा, आ. प्रसाद लाड, आ. बाळा नांदगावकर, आ. अजय चौधरी, नागरी बँक असोसिएशनचे, महाराष्ट्र अध्यक्ष विद्याधर अनास्कर, बृहन्मुंबई बँक असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘रायगड सहकारी बँक लि.’चे अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे.