अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा म्हणून राष्ट्रपतींना पत्र

    24-Apr-2022
Total Views |

letter
 
 
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठी भाषा दालनाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे .केंद्र सरकारने २००४ साली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी पत्र पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन , मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महामहिम राष्ट्रपतीना रसिकांचे पत्र पोष्टाच्या माध्यमातून पाठवण्या साठी सोय या दालनात करण्यात आलेली आहे.
 
 
भाषाप्रेमींची ही शिफारस पत्र या माध्यमातून पाठवली जाणार आहेत , केंद्र सरकारने नेमलेल्या भाषा तज्ञांने लेखी शिफारस केंद्राकडे करून देखील अनेक वर्षे होउन गेली . मराठी भाषा ही अतिशय प्राचीन भाषा आहे , मोठ्या संतांची परंपरा अपल्या भाषेला लाभली आहे. ह्या राजभाषेला , ज्ञानभाषेला , लोकभाषेला अमलात आणता यावे म्हणून अनेक वर्षांचा इतिहास त्याच्या मागे आहे. तरीदेखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही . त्यामुळे माननीय राष्ट्रपतींनी ही शिफारस ध्यानी घेऊन तिला ' अभिजात ' भाषेचा दर्जा द्यावा, असे सांगणारे पत्र रसिकांच्या वतीने पोस्टकार्ड ने पाठविण्यात येत आहे .