राज्यात गुंडगिरी, दहशत पसरवली जात असताना पवार गप्प का?

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

    24-Apr-2022
Total Views |

upadhye
 
 

मुंबई: देशातील केंद्रीय यंत्रणा या राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी पोलिसांचा वापर करून राज्यात दहशत, गुंडगिरी पसरवली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का बसले आहेत? असा संतप्त सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.भाजप नेत्यांवर हल्ले होणं असतील तर भाजपही संघर्षात मागे पडणार नाही असा इशाराही उपाध्ये यांनी दिला आहे.
 
 
 
महाविकास आघाडी केरळ, पश्चिम बंगाल सारखी स्थिती निर्माण करत आहे, उघडपणे कॅमेऱ्यासमोर धमक्या दिल्या जात आहेत तरी पोलीस बघ्याची भूमिका घेतात, हीच तुमची कायदा- सुव्यवस्था का? कोणाचा वचक राहिला आहे की नाही? असे सवाल उपाध्ये यांनी केले आहेत. सत्तेची मग्रुरी आलेल्या महाविकास आघाडीला जर आपण यांची तोंडं बंद करू शकू असे वाटत असेल तर या सरकारला उखडून फेकून देऊ असा इशारा उपाध्ये यांनी दिला आहे.