मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली. "शिवसेनेच्या १०० गुंडांचा माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव होता" अशा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. ठाकरे सरकारच्या सांगण्यावरून मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा हल्ला घडवून आणला अशा शब्दांत सोमय्या यांनी संजय पांडे यांच्यावरही आरोप केले.
माझ्यावर आतापर्यंत तीन वेळा हल्ले होऊनसुद्धा कुठलाच गुन्हा नाही पण माझ्याविरोधात चुकीचा एफआयआर नोंदवला जातो हे आपल्या विरुद्धचे षडयंत्र असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या सर्व घटना प्रकाराबद्दल केंद्रीय गृहसचिव अजयकुमार यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेले नवनीत राणा, रवी राणा यांची भेट घेण्यास सोमय्या खार पोलीस स्टेशन येथे गेले होते.