‘शिवशाही’ कंपनीवर सेवानिवृत्त अधिकार्‍यांचे वर्चस्व?

    22-Apr-2022
Total Views |
 
 
shivshahi
 
 
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील झोपडीधारकांसाठी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या ‘शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्या.’ या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या कंपनीचा कारभार गेल्या १५ वर्षांपासून सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या ताब्यात असल्याची चर्चा ‘शिवशाही’ कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
 
 
१९९८ साली ‘शिवशाही’ कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने गेल्या १७ वर्षांत दहा योजनांच्या माध्यमातून फक्त १० हजार, ६७२ घरे बांधली. आघाडी सरकारनेही आपल्या कार्यकाळात या कंपनीकडे १५ वर्षे दुर्लक्ष केले. त्यात युती सरकार सत्तेवर आल्याने मोठ्या प्रमाणत परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी ‘शिवशाही’ कंपनीला ५०० कोटी रुपये देण्यात आले. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून सेवानिवृत्त अधिकार्‍यांच्या हातात ही कंपनी असल्यानेच कंपनीची घरांची फॅक्ट्री बंद असून, या ‘शिवशाही’ कंपनीत मोठ्या प्रमाणात अफरातफर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
 
 
याविषयी ‘शिवशाही’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर तावडे यांना विचारले असता त्यांनी यास दुजोरा दिला असून, अगोदरच सरकारी नियमानुसार सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी अधिकार्‍यांना सेवेत सामावून घेतल्याचे सांगितले आहे.