लोक शिवसेनेला सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत ! - प्रकाश मेहता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2022   
Total Views |

MTB  


 
 
मुंबई : 'मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हजारो कोटींचा कर गोळा केला जातो, पण त्या तुलनेत काहीही सुविधा दिल्या जात नाहीत कोरोनाकाळात लोक मरत असताना शिवसेनेचे नेते हजारो कोटींच्या मालमत्ता गोळा करत होते चोवीस वर्षांमध्ये मुंबईत रस्त्यांवर 21 हजार कोटींचा खर्च झाला नव्हे तर ते पैसे खड्ड्यात गेले. त्यामुळे लोक मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळले असून ते आता सत्ताधाऱ्यांना सिंहासनावरून खाली घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे. गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी मालाड पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलखोल सभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर, गणेश खणकर यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
आम्हाला छेडलंत तर आम्हीही सोडणार नाही ! 
 
आ. अतुल भातखळकर म्हणाले की, ' भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फोन कॉल अभियानावर काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोल-खोल अभियानावर काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. भाजपने सभेसाठी उभारलेली स्टेज काही शिवसैनिकांनी तोडले मात्र संविधानिक मार्गाने विरोध करणे आमचा अधिकार आहे तो अधिकार आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही जर तुम्ही आम्हाला छेडल तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत. आम्ही कुणाला छेडणार नाही, पण जर आमच्या कुणी वाटेला गेले तर त्याला आम्ही सोडणारही नाही,' असा सज्जड दम आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला यावेळी दिला.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@