मेंटेनन्स थकविणार्‍या सदनिकाधारकाची सदनिका ‘सील’

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनची कार्यवाही

    22-Apr-2022
Total Views |
seal

ठाणे(प्रतिनिधी):
गृहनिर्माण सोसायटीचा मेंटेनन्स थकवणार्‍या सदनिकाधारकाची सदनिका ‘सील’ करण्याची मोठी कार्यवाही ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाच्या मंडळ अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केली. ठाण्यातील रामचंद्र नगर नं.3 येथील पारिजात सुंदरवन सोसायटीतील थकबाकीदार प्रेमलता मोदी व दिपककुमार मोदी यांच्या सदनिकेवर ही कारवाई करण्यात आली. तसेच, ही सदनिका लिलावदाराच्या स्वाधीन करण्यात आली. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अशा प्रकारची कठोर कारवाई टाळण्यासाठी सदस्यांनी सोसायटीचा मेंटेनन्स नियमित भरण्याचे आवाहनही राणे यांनी केले. ठाणे पश्चिमेकडील रामचंद्र नगर नं.3 येथील पारिजात सुंदरवन सोसायटीतील 201 क्रमांकाची सदनिका प्रेमलता मोदी व दिपककुमार मोदी यांची होती. मात्र, मोदी यांनी 2005 पासुन सोसायटीचा मेंटेनन्स थकवला होता. 2009 पर्यंत थकबाकीचा आकडा पाच लाख रुपयांवर पोहोचल्याने सोसायटीच्या तक्रारीवरून उपनिबंधकांनी नोटीस बजावून कागदोपत्री सदनिकेवर जप्तीची कारवाई केली होती. तरीही संबधितांनी थकबाकी न भरल्याने अखेर 2015 साली सदनिकेचा 77 लाख, 25 हजार रुपयात लिलाव करण्यात आला. दरम्यान, थकबाकीदाराने कारवाई रोखण्यासाठी कोर्टकज्जे केले. मात्र, न्यायालयाने त्यांचे दावे फेटाळले.