संजय राऊत पुन्हा अडचणीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2022   
Total Views |

sr
 
 
मुंबई(प्रतिनिधी): शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भाजप नेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर राऊत यांनी न्यायालयावर अवमानकारक आरोप केले होते. याचसंदर्भात ‘भारतीय बार असोसिएशन’ने आता कायदेशीर भूमिका घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर खोटे, निंदनीय आणि अवमानकारक आरोप केल्याबद्दल संजय राऊत आणि इतरांविरूद्ध अवमान याचिका आणि जनहित याचिका दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय दिल्यानंतर राऊत यांनी न्यायाधीशांवर आणि न्यायव्यवस्थेवर आरोप केले होते, त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
 
संजय राऊतांचे आक्षेपार्ह विधान.
 
“एकीकडे न्यायालयाने भाजपशी संबंधित असलेल्यांना दिलासा दिला आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपींना अद्याप कुठलाही दिलासा मिळालेला नाही,” असे वादग्रस्त विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा रोख हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जामीन न मिळण्यासंदर्भात होता. दहशतवाद्यांशी व्यवहार केल्याने तुरुंगात बंद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि वसुली प्रकरणात जेलची हवा खात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेच दुसरे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायपालिकेने पक्षपातीपणाचा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.
 
मुख्यमंत्री - गृहमंत्री प्रतिवादी
‘बार असोसिएशन’च्यावतीने दाखल करण्यात आलेल्या या अवमान याचिकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी तथा ’सामना’च्या संपादिका रश्मी उद्धव ठाकरे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@