मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काहीसा दिलासा देत सातारा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा पोलिसांकडे सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
सदावर्ते यांच्या विरोधात साताऱ्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. ४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. छत्रपती घराण्याबद्दल आक्षपार्ह विधान केल्यामुळे सदावर्ते यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि अन्य ११४ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. नुकतीच मुंबई सत्र न्यायालयानं सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र कोल्हापूर, सातारा, अकोला अशा विविध ठिकाणी त्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्यामुळे चौकशीसाठी त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येत आहे.