समाजप्रगतीची गुढी उभारण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2022   
Total Views |
news


समाजप्रगतीची गुढी उभारण्यासाठी... वारंवार येणार्‍या अडथळ्यांवर मात करत, शून्यातून अस्तित्व निर्माण करणे कठीणच असते. या कठीण कार्यातही यश मिळवणारे आनंद कांबळे. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...



“आनंदराव उद्योगपती आहात, खूप मोठे व्हा, समाजासाठी काम करा,” असा आशीर्वाद रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आनंद कांबळे यांना दिला. ‘अथिया इंडस्ट्रिज’, ‘मिलेनियर बिल्डर्स आणि डेव्हलपर्स’चे संस्थापक(हा प्रोजेक्ट पुष्कर नगर, इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला सुरू आहे) असलेलेआनंद कांबळे यांच्या आयुष्यातला तो प्रेरणादायी प्रसंग होता. तसे रा. स्व. संघाचे सुमंत आमशेकर, रवी गोळे आणि संपर्कातील रा. स्व. संघाशी संबधित लोकांमुळे आनंद यांना रा. स्व. संघाप्रती आत्मियता होती. ते सामाजिक कार्यात गतिशीलचहोते.



त्यांनी ‘मिलेनियर चेंबर्स अ‍ॅण्ड कॉमर्स इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून हजारोनवउद्योजकांना मार्गदर्शन केले आहे. कोरोना काळात त्यांनी त्यांच्या ‘अथिया इंडस्ट्रीज’मधील कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले नाही की, त्यांचे वेतन थांबवले नाही. उलट 10 तारखेला होणारे वेतन 1 तारखेलाच मिळू लागले. या काळात त्यांनी समाजातील शेकडो लोकांना रेशन किट वितरित केले. या गरजूंना सर्वार्थाने मदत केली. समाजाप्रतीची त्यांची तळमळ, धडपड आणि उद्योगक्षेत्रातली त्यांची झेप पाहिली की, प्रश्न पडतो आनंद कांबळे यांचे जीवन कसे घडले असेल?



आनंद कांबळे यांचे मुळ गाव कर्‍हाडचे. नत्थू कांबळे आणि बाळुबाई कांबळे यांना चार अपत्ये, त्यापैकी एक आनंद. चेंबूर, घाटला व्हिलेजमधील त्यांच्या पत्र्याच्या घरात माणसांचा राबता असे. नत्थू यांनी गावातल्या 35 जणांना तरी मुंबईत आणून नोकरीला लावले. कुणाचे शिक्षण पूर्ण केले होते, तर कुणाचे लग्न लावून दिले होते. आईनेही या सगळ्यांना पोटच्या मुलांसारखेच वागवलेले. आई-वडिलांचे हे संस्कार आनंद यांच्या पुढच्या सामाजिक कार्यासाठी शिदोरीच होती. पुढे दहावीनंतर आनंद यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. शिकतानाच कामही करू लागले.



एकदा ‘ऑडिट’साठी ते एका नामांकित कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयातले लोक त्यांच्याकडे अत्यंत संशयास्पद-चमत्कारिक नजरेने पाहू लागले. आपले काय चुकले, हे आनंद यांना कळालेच नाही. नंतर त्यांचा सहकारी त्यांना म्हणाला, “अरे तू स्लिपर घालतोस, इथे यायचे तर शूज घालायला हवे होते.” हे ऐकून आनंद यांना वाईट वाटले. माणसाची किंमत त्याचे कपडे आणि चपला यावरून ठरवली गेली होती. आनंद यांनी खुणगाठ बांधली की, या गरिबीतून बाहेर पडायचे. पुढे पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी एका ‘सीए’कडे नोकरी केली. काही महिन्यांनी त्यांनी रजेच्या दिवशी मित्रासोबत ‘सेल्स टॅक्स’ सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली.




त्यांनी हे ‘सीए’ला सांगितले, तर ‘सीए’ म्हणाले, “तू रजेच्या दिवशीही स्वतःचे काही काम करायचे नाही.” आनंद यांना वाईट वाटले आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पूर्णवेळ ते मित्रांसोबत ‘सेल्स टॅक्स’ सल्लागाराचे काम करू लागले. सुरुवातीच्या काळात उद्योगधंद्यांना भेटी देण्यासाठी ते शीव ते संपूर्णधारावी ते माहिम अगदी साकीनाका ते विक्रोळीपर्यंतसुद्धा पायीच प्रवास करायचे. प्रवासाचेे पैसे वाचवायचे. कष्ट करून त्यांनी शेकडो ग्राहक जमवले. याच काळात त्यांना पूर्वीच्या ‘बॉस’ने म्हणजे त्या ‘सीए’ने विचारणा केली, “तुला काय करायचे ते कर, पण माझ्याकडे पुन्हा नोकरी कर.” ‘सीए’ने आनंद यांना पुन्हा बोलावले.कारण, आनंदसारखी समर्पित भावाने काम करणारी व्यक्ती मिळणे अवघड होते.




आनंद यांनी नम्रपणे हा प्रस्ताव नाकारला. पुढे ते स्वदेशी मार्केटिंगच्या सान्निध्यात आले. तिथेच त्यांची ओळख ‘प्लॉट’ विक्री करणार्‍या एका व्यक्तीशी झाली. आपण या उद्योगातही काम करू शकतो, असे आनंद यांना वाटले. सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी दोन हजारांच्यावर ‘प्लॉट’ विक्री केली. त्याचे कमिशन म्हणून त्यांना पावणेदोन लाख रुपये मिळाले. पुढील सात-आठ महिन्यांत इतकी रक्कम मिळणार होती. पण, आनंद यांना कळाले की, ‘प्लॉट’विकत घेणार्‍यांची फसवणूक होणार आहे. आनंद यांना वाटले की, आपण अप्रत्यक्षपणे या व्यवहारात होतो. लोकांना पैशांच्या मोबदल्यात ‘प्लॉट’ मिळाले नाहीत, तर ते पाप आहे. त्यांनी ‘प्लॉट’ विकत घेणार्‍यांना संभाव्य धोक्याबाबत लगेच सुचित केले. लोकांचे नुकसान नको म्हणून मित्राच्या सोबत ‘प्लॉट’ विक्री करणारी कंपनी निर्माण केली. ज्यांनी आधी त्या ‘प्लॉट’मध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना आधी भरलेले पैसे कमी करून ‘प्लॉट’ उपलब्ध करून दिले.



स्वत:चे नुकसान करून आनंद आणि मित्राने हे सगळे केले कारण सचोटी, प्रामाणिकपणा. आनंद यांनी या कपंनीसाठी आयुष्याचे सर्वोत्तम लक्ष्य आणि कष्ट दिले. कंपनी मोठी झाली. मात्र, मित्राने या कंपनीत स्वतःच्या नातेवाईकांना विश्वस्त केले. आनंद यांना यात कुठेच स्थान नव्हते. या घटनेने ते खचले. या काळात त्यांची पत्नी मानसी त्यांच्यासोबत ठाम उभी राहिली. आनंद म्हणतात, “कुटुंब आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद यामुळे त्या निराशेतून बाहेर पडलो. या काळात सुनील वारे, तुकाराम साठे यांच्यासारख्या मार्गदर्शकांची साथ लाभली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायकासारखे मला समाजाचे देणे फेडायचे आहे. समाजप्रगतीच्या गुढी उभारणीत सहभागी व्हायचे आहे.” लहुजी वस्तादांना आदर्श मानून अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या नायकाचा वारसा जपणारेआनंद कांबळे समाजउत्थानाच्या गुढी उभारणीतले शिलेदार आहेत हेच खरे.



9594969638
@@AUTHORINFO_V1@@