तामिळनाडूतून पालीच्या नव्या प्रजातीचा उलगडा; ही आहेत वैशिष्ट्य...

कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्यात अधिवास

    02-Apr-2022   
Total Views | 101

gecko

 
मुंबई (प्रतिनिधी) - तामिळनाडूतील कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्यातून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या पालीचे शरीर मोठे असून या पालीचे नामकरण 'हेमिडॅक्टायलस हेगडेई' असे करण्यात आले आहे. ही पाल 'हेमिडॅक्टायलस' कुळातील ४९वी प्रजाती आहे.
 
 
नव्याने शोधण्यात आलेली ही पाल भारतीय 'हेमिडाक्टायलस' कुळातील 'प्रशादी' गटाची सदस्य आहे. या गटातील पाली इतर गटातील पालींपेक्षा रूपात्मक वर्णांच्या आधारे ओळखल्या जाऊ शकतात. या पालींचे शरीर लहान ते मोठ्या स्वरूपाचे असते. त्या जगभरातील अनेक प्रकारच्या परिसंस्थांमध्ये आढळतात. या पाली उष्णकटिबंधीय क्षेत्रात पसरलेल्या प्रजातींमधील सर्वात वैविध्यपूर्ण पालींपैकी एक आहेत. 'हेमिडाक्टायलस' कुळामधील या पालींच्या पाठीवर लहान गोलाकार खवल्यांसह मोठ्या शंकूच्या आकाराचे उंचवटे (ट्यूबरकल) असतात. हे उंचवटे एखाद्या पंक्तीमध्ये लावल्यासारखे दिसतात. तसेच या पालींच्या पायातील बोटांमध्ये जाळीदार पडदा असतो. ही बोटं पानांसारखी दिसतात, म्हणून या पालींना 'लीफ-टोड गेको' असेही म्हणतात. अशा 'हेमिडाक्टायलस' कुळातील पालीच्या नव्या प्रजातीचा शोध  'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे सौनक पाल आणि 'द नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगलोर'चे झीशान मिर्झा या मुंबईतील दोन तरुण संशोधकांनी लावला आहे.
 
 
H.Hegdei1


 
ही नवीन प्रजाती, 'हेमिडॅक्टायलस हेगडेई' या शास्त्रीय नावाने आणि 'हेगडेस रॉक गेको' या सर्वसामान्य नावाने ओळखली जाईल. ही पाल दक्षिण पश्चिम घाटातील जंगलांमध्ये प्रदेशनिष्ठ आहे. संशोधकांना ही प्रजाती तामिळनाडूच्या कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्य मधील कमी ते मध्य-उंचीच्या ओलसर-पानझडी जंगलात प्रथम सापडली होती. झऱ्यांच्या काठावर असलेल्या दगडांवर आणि खडकांवर ही पाल वास्तव्य करते. या प्रजातीला विठोबा हेगडेंचं नाव देण्यात आले. वन्यजीव आणि प्राणीशास्त्रीय संशोधन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. हेगडे हे तब्ब्ल ४० वर्षांपासून 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयात वरिष्ठ सहाय्यक आहेत. अलिकडेच पश्चिम घाटामधून 'हेमिडॅक्टायलस' कुळातील 'हे. वनम', 'हे. परागवली', 'हे. ताम्हणीएन्सिस' आणि 'हे. एसई' या शरीराने मोठ्या आकाराच्या नव्या पालीच्या प्रजातींचा शोध लागला आहे. “गेल्या काही वर्षांत या कुळातून पाचहून अधिक नवीन प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. आमचा शोध असे दर्शवितो की, त्यांचा आकार मोठा असूनही, या पालींचा फारसा अभ्यास केला जात नाही आणि त्यांच्या विविधतेला कमी लेखले जाते”, असे सौनक पाल म्हणाले. 
 
  

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121