मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगा स्थानकादरम्यान शुक्रवारी (दि १५ एप्रिल) गडद एक्सप्रेस आणि पाँडीचेरी एक्सप्रेसमध्ये रात्री ९.२१ दरम्यान झालेली धडक ही 'स्पॅड'(SPAD) मुळे झाली असल्याचा निष्कर्ष म. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काढण्यात आला आहे. गडद एक्सप्रेसच्या लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटचे गाडीच्या वेगावरील संतुलन बिघडल्याने लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे गेल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या चालवताना सिग्नलकडे आणि गाडी चलवण्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे असल्याचे म. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.