राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल शरद पवारांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे!

    18-Apr-2022
Total Views | 182

AB
 
मुंबई: याबाबत मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “शरद पवार यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला. ज्या मुद्द्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला. ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ पुस्तकाचे लेखक जेम्स लेन याने आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो, असे स्पष्ट केले. आता महाराष्ट्रात विनाकारण पेटवापेटवी केल्याबद्दल आणि सातत्याने शिवशाहिरांबाबत गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार आहेत का? राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 
 “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून आपल्याला कोणतीही माहिती मिळाली नव्हती किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून पुस्तकात काहीही लिहिलेले नाही,” असे स्पष्टीकरण स्वतः लेखक जेम्स लेन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली.
 
जेम्स लेन याने म्हटले आहे की, “मला अशी कोणतीही माहिती कुणीही दिलेली नाही. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गोष्टी या समर्थ रामदासांशी जोडतात, तर काही तुकारामांशी. यांपैकी कुणाची माहिती योग्य आहे, यात मला रस नाही. एखादी व्यक्ती ‘अ’ नावाचे ‘नॅरेटिव्ह’ का योग्य मानते किंवा दुसरा गट ‘ब’ नावाचे ‘नॅरेटिव्ह’ का योग्य मानते, हे मला माहीत नाही. मात्र, तुम्ही माझे हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की, मी यात कोणताही ऐतिहासिक दावा केलेला नाही. जे म्हणतात की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांनी माझ्या लिखाणाचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी ऐतिहासिक तथ्यांबद्दल पुस्तकात लिहिलेले नाही. केवळ ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्याबद्दल लिहिले आहे,” असे स्पष्टीकरण जेम्स लेन यांनी नुकतीच दिले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121