अनिल देशमुखांना न्यायालयाचा धक्का

    16-Apr-2022
Total Views |
 
 
 
 
 
anil
 
 
 
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २९ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांच्या बरोबर कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांच्याही कोठडीत वाढ केली गेली आहे. सीबीआयने न्यायालयात देशमुख यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती पण न्यायालयाने ती फेटाळून लावत त्यांना २९ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभर गाजलेल्या अँटिलीया प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.