देश भरात सरासरी पेक्षा चांगल्या पाऊसाचा अंदाज: भारतीय हवामान विभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2022   
Total Views |

paus
 
मुंबई(प्रतिनिधी): भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये ईशान्य भारत, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि लडाख वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये मान्सून 'सामान्यतेपेक्षा जास्त' असू शकतो. दरम्यान, स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने आपल्या अंदाजात म्हटले आहे की नैऋत्य मान्सूनच्या पूर्वार्धात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर) पेक्षा जास्त पर्जन्यमान अपेक्षित आहे.
 
नैऋत्य मोसमी मान्सून हा जून ते सप्टेंबरच्या महिन्यात संपूर्ण देशभरात चांगल्या प्रमाणात राहील अशी शक्यताअसल्याचे वृत्त भारतीय हवामान खात्याने दिले आहे. सध्या, विश्ववृत्तीय पॅसिफिक प्रदेशावर 'ला निना' चा प्रभाव दिसून येत आहे.आणि पावसाळ्यात सुद्धा हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
सिंचनात सुधारणा होऊनही, भारतातील एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी जवळपास निम्मी जमीन अजूनही पावसावर अवलंबून आहे. येणारा नैऋत्य मान्सून कृषी उत्पादनाला चालना देईल आणि गेल्या काही महिन्यात वाढलेल्या महागाईची चिंता कमी करेल, ज्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेला मदत होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला, खाजगी हवामान अंदाज संस्था, स्कायमेट ने देखील त्यांच्या हवामान अंदाजात सांगितले होते की २०२२ मध्ये नैऋत्य मान्सून हा पूर्वीच्या सरासरीच्या ९८ टक्के असेल.
@@AUTHORINFO_V1@@