अनिल देशमुखांसह सचिन वाझेंची सीबीआय कोठडी वाढवली

    12-Apr-2022
Total Views |
 
 
anil
 
 
 
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि आता ४०० कोटींच्या घोटाळ्यात सीबीआय कोठडीत असणाऱ्या अनिल देशमुख हे पोलिसांना चौकशीत योग्य सहकार्य करत नसल्याच्या आरोपावरून सीबीआय विशेष कोर्टाने त्यांची कोठडी १६ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. अनिल देशमुखांबरोबर, कुंदन शिंदे, संजीव पालांडे, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचीही कोठडी वाढवणात आली आहे. अनिल देशमुख पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना अजिबात उतारे देत नाहीत, शांत बसून राहतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
 
अनिल देशमुख यांच्यावरचे सर्व आरोप चुकीचे असून चौकशी दरम्यान शांत राहण्याचा त्यांना अधिकार आहे. ही गोष्ट सीबीआय कोर्टाने अमान्य केली असून अनिल यांच्यावर ४०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत, यामध्ये बरीच बडी नवे गुंतलेली असू शकतात. अनिल देशमुखांनी बोलल्याशिवाय ही नावे बाहेर येऊ शकत नाहीत त्यामुळे देशमुखांना शांत राहण्याची मुभा देता येणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. देशमुखांना विविध आजार आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे त्यामुळे त्यांच्या सीबीआय कोठडीची मर्यादा वाढवू नये अशी मागणी त्यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केली होती पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
 
 
 
सचिन वाझे हेही या प्रकरणातले मोठे आरोपी असल्याने त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच या प्रकरणातील सर्व आरोपींची सीबीआय कोठडी कोर्टाने १६ एप्रिल पर्यंत वाढवली आहे.