प्राणवायू आणि प्रकाशाच्या मदतीने शास्त्रज्ञांनी बनवले बेन्झोईक ऍसिड

    12-Apr-2022
Total Views | 91

plastic
 
 
मुंबई: न्यूयॉर्क येथील कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या रसायनशास्त्रज्ञांनी 'पॉलीस्टीरिन' पासून बेंझोइक ऍसिड निर्माण करण्यासाठी प्रकाश आणि 'ऑक्सिजन' वापरण्याचा एक प्रभावी मार्ग शोधला आहे. 'पॉलीस्टीरिन'  हे अनेक सामान्य वस्तूंमध्ये आढळणाऱ्या एक प्रकारचे प्लास्टिक आहे. आणि 'बेंझॉइक ऍसिड' या रसायनाचा वापर सुगंधी द्रव्येसह अनेक सर्वव्यापी उत्पादने तयार करण्यात होतो, आणि ते पदवीपूर्व आणि उच्च माध्यमिक शाळेतील रसायनशास्त्र प्रयोगशाळेत सर्रास आढळून येते. 
 
 
 
जगभरातील डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याचा एक तृतीयांश भाग हा पॉलिस्टीरिनपासून बनलेला असतो ज्यामध्ये 'स्टायरोफोम' ने बनलेले अंड्याचे डब्बे, 'हार्ड प्लॅस्टिक' 'कॉम्पॅक्ट डिस्क केसेस', 'दिस्पोझेबल कप' आणि इतर अनेक सामान्य उत्पादनांचा समावेश होतो. कॉर्नेल येथील रसायनशास्त्र आणि रासायनिक जीवशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक 'एरिन स्टॅचे' यांच्या नेतृत्वाखालील टीमने  ही रासायनिक प्रक्रिया अगदी सूर्यप्रकाशात देखील होऊ शकते याचा मागोवा घेतला. त्यांनी या बद्दलचा अहवाल अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये "केमिकल अपसायकलिंग ऑफ कमर्शियल पॉलिस्टीरिन वाया कॅटॅलिस्ट-कंट्रोल्ड फोटोऑक्सिडेशन" हा शोधनिबंध प्रकाशित केला. रसायनशास्त्राद्वारे पर्यावरणविषयक समस्यांना तोंड देण्याच्या उद्दिष्टानुसार, ही नवीन प्रक्रिया सौम्य, हवामानास अनुकूल आणि व्यावसायिकी कचऱ्याबाबत मोजण्यायोग्यआहे, शिवाय, ही प्रक्रियेद्वारे घाण, रंगीत आणि इतर प्रकारच्या प्लॅस्टिकसह अनेक मिश्र पदार्थांवर प्रभावी आहे. असे स्टॅचे म्हणाले. गेल्या उन्हाळ्यात, संशोधकांनी स्टॅचेंच्या प्रयोगशाळेतील खिडकीत या संबंधीचे प्रयोग केले. या प्रक्रियेचा संभाव्य व्यावसायिक प्रयोग दाखवण्यासाठी, संशोधकांनी 3D-मुद्रित उपकरणांमध्ये दोन सिरिंज पंप आणि दोन 'एल ई डी' दिवे असलेला सेटअप तयार केला होता.
 
 
 
"प्रकाश वापरल्यामुळे उत्प्रेरकांच्या आधारे या रासायनिक प्रक्रियेवर उत्कृष्ट नियंत्रण मिळवले जाऊ शकते. जर आम्ही ही प्रक्रिया चालवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करू शकलो, तर तो एक मोठा विजय ठरेल," असे स्टॅचे म्हणाले सध्या 'पॉलिमर' पुनर्वापरासाठी वितळण्यासाठी आणि प्रक्रियेसाठी पॉलिमर गरम करणे आवश्यक आहे, ज्यासाठी सामान्यतः जीवाश्म इंधन आवश्यक आहे. 'पॉलीस्टीरिन' प्लॅस्टिकमध्ये मिसळलेल्या इतर रसायनांवर प्रक्रियेची सहनशीलता तपासण्यासाठी, संशोधकांनी पॅकेजिंग प्लास्टिक पासून कॉफी कप झाकणांपर्यंत अनेक उत्पादने वापरली.प्रयोगा दरम्यान असे निदर्शनास आले की तीन वस्तू कार्यक्षमतेने खराब झाल्या या मध्ये एक पांढरा कॉफी कप झाकण, स्टायरोफोम आणि एक पारदर्शी झाकण. तसेच दुसऱ्या कॉफी कपच्या काळ्या रंगांमुळे प्रकाशाच्या प्रवेशास प्रतिबंध झाला आणि ते कमी कार्यक्षमतेने विघटित झाले, असे स्टॅचे म्हणाले.
 
 
"आम्ही हीच प्रक्रियाआणखी कार्यक्षम बनवू शकलो तर, आम्ही त्याचे व्यावसायिकीकरण कसे करावे आणि कचरा व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा याबद्दल विचार करू शकतो," स्टेचे म्हणाले. या संशोधनाला काही प्रमाणात 'नॅशनल सायन्स फाउंडेशन'ने पाठिंबा दिला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121