वृक्षांवर राहणाऱ्या विंचव्याच्या नव्या जातींचा पश्चिम घाटामधून शोध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2022   
Total Views |
sco
 
(आयसोमेट्रस वायनाडेन्सिस)


मुंबई (प्रतिनिधी): वृक्षांवर अधिवास करणाऱ्या विंचवाच्या दोन नव्या जातींचा पश्चिम घाटामधून शोध लावण्यात आला आहे. तसेच एका पूर्वसशोधीत जातीची वैधता पुनर्स्थापित करण्यात आली आहे. नव्या जाती या केरळमधील वायनाड आणि कर्नाटकमधील साकलेश्पुर येथे आढळून आल्या आहेत, तर वैधता पुनर्स्थापित करण्यात आलेली जात कर्नाटकच्या सुंकेरी येथे सापडली आहे. 



WG



पुण्यातील 'इनसर्च एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स' या संस्थेतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. यासंदर्भातील शोधनिबंध 'युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी' या जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे जनुकांमध्ये होणाऱ्या उत्क्रांतीवर आधारीत 'टाईम डेटिंग फायलोजेनी' ही पद्धत पहिल्यांदाच वापरण्यात आली आहे. या प्रक्रियेव्दारे कोणती जात किती कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांत झाली वा त्यांच्या कुळाच्या मुळपुरुषापासून कधी वेगळी झाली याचे जवळपास अचूक आडाखे मांडण्यात आले आहेत. या संशोधनाला शौरी सुलाखे, शुभंकर देशपांडे, गौरांग गोवंडे, निखील दांडेकर आणि मकरंद केतकर या मुख्य संशोधक चमुसहीत 
चैतन्य रिसबुड, स्वयम ठक्कर, मुक्ता नाचरे, सृष्टी भावे, पुष्कर फणसळकर आणि पराग कोकणे यांचे सहकार्य लाभले.


 scor
(आयसोमेट्रस नक्षत्र) 
 
 

संशोधनात नव्याने शोधलेल्या प्रजाती या 'बुथीडे' कुळातील आहेत. यामधील वायनाड येथे सापडलेल्या विंचवाला 'आयसोमेट्रस वायनाडेन्सिस' असे नाव देण्यात आले आहे. तर साकलेशपूर येथील 'कडमाने टी इस्टेट' या परिसरातून शोधलेल्या प्रजातीला 'आयसोमेट्रस नक्षत्र' हे नाव देण्यात आले आहे. साकलेशपूर येथील मांजराबाद किल्ल्याच्या ताऱ्यासारख्या आकारावरून या जातीला हे नाव दिले आहे. १९८२ साली 'भारतीय वन्यजीव संस्थे'तील संशोधक व प्रसिद्ध विंचू अभ्यासक डॉ. देशभुषण बस्तावडे यांनी सुंकेरी येथून 'आयसोमेट्रस सांकेरियेन्सिस' जातीचा शोध लावला होता. मात्र, २००३ साली एका परदेशी संशोधकाला या विंचवांचे रंगरूप दुसर्‍या विंचवांसोबत मिळतेजुळते आढळले. त्याने सुंकेरी येथील विंचू ही नवीन जात नसून जुनीच जात आहे, असा संशोधन निबंध प्रसिद्ध केला होता. परंतु, या मोहिमेतून प्रकाशात आलेल्या जनुकीय संशोधनानुसार या दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत, हे सिद्ध झाले. त्यामुळे सुंकेरी येथील विंचवांना त्यांची मूळ ओळख परत मिळवून देण्यात आली.

 
scorpio
(आयसोमेट्रस सांकेरियेन्सिस)
 
 
 
"आज भारतीय शास्त्रज्ञांना कोणत्याही परकीय सहकार्याची आणि परदेशी निधीची गरज नाही. पाश्चात्य जगापेक्षा आपण स्वतःहून काही वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी करू शकतो. हा शोधनिबंध या पूर्वी दुसर्‍या 'जर्नल'ने नाकारला होता आणि तो दीड वर्षांहून अधिक काळ पुनरावलोकनात होता. आम्ही समीक्षकांना आमचे गृहितक मान्य करेपर्यंत योग्य खंडन करत राहिलो.'' अशी माहिती 'इनसर्च एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स'च्या वन्यजीव अभ्यासक शौरी सुलाखे यांनी दिली. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@