नवी दिल्ली: भारतीयांचा इलेकट्रीक वाहनानांकडे कल वाढत असल्याचे समोर आले आहे. २०२१-२२ या एका वर्षात ४,२९,२१७ इलेकट्रीक वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. २०२०-२१ या वर्षात १,३४,८२१ वाहनांची विक्री झाली होती त्यात तिपटीने वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधनांच्या किमतींमुळे नागरिकांचा इलेकट्रीक वाहनांकडे ओढा वाढताना दिसतो आहे.
देशातील एक अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनी असलेली टाटा मोटर्स या वाहनांच्या विक्रीत आघाडीवर आहे. टाटा मोटर्सने १५,१९८ इलेकट्रीक वाहनांची विक्री करत पहिला क्रमांकावर आहे. यानंतर एमजी मोटर्स इंडिया २०४५ वाहनांची विक्री करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारकडूनही इलेकट्रीक वाहनांचा प्रसार जास्त व्हावा यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत या सर्व गोष्टींचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.