३१ वर्षांनी होणार काश्मिरी पंडिताच्या हत्येची सुनावणी

बिट्टा कराटेच्या हातून हत्या झालेल्या सतीश टिकू खटला

    01-Apr-2022
Total Views |
   
bitta
श्रीनगर: द काश्मीर फाइल्स चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली आहे. त्यामुळे त्यावेळी दहशतवादी बिट्टा कराटेच्या हातून झालेल्या हत्येविरोधात तब्ब्ल ३१ वर्षांनी न्यायालयात दाद मागण्यात आलेली आहे. श्रीनगर मध्ये दुकानदार असलेल्या सतीश टिकू यांची २ फेब्रुवारी १९९० रोजी दहशतवाद्यांकडून हत्या झाली होती. त्यामागे बिट्टाचा हात होता. या प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर १६ एप्रिल रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.
 
 
सतीश यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सतीश यांचे भाऊ महाराजा कृष्ण टिकू यांनी सतीश यांच्या हत्येच्या सुनावणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. फारुख अहमद दार हे खरे नाव असलेल्या बिट्टा कराटेच्या नावावर सतीश टिकू  यांच्यासह अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचा आरोप आहे. बिट्टाने या हत्यांबाबत उघड कबुलीही दिली होती.