समाजाचा संघर्षशील आदर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |
 
 
govind
 
 
नीतिमत्ताशील धर्माचा संदेश देणार्‍या श्री संत वीरशैव कक्कया महाराजांचा वारसा सांगणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार शोषित-वंचित समाज घटकांसाठी काम करणारे, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा मुंबईचे सचिव गोविंद खरटमोल. शून्यातून आणि भयंकर नकारात्मक परिस्थितीतून समाजासाठी धडपडणार्‍या गोविंद खरटमोल यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडणारा हा लेख....
 
 
कोणालाही लाचार, हतबल पाहू शकत नाही. मी कोणत्याही भुकेल्या माणसाची भूक समजू शकतो. कारण, त्यांच्यात मी माझा भूतकाळ पाहतो. परमेश्वराने आज मला सक्षम बनवले आहे, तर माझ्या संपर्कात येणार्‍या दुःखितांचे अश्रू पुसून त्यांना आयुष्यात पुन्हा उभे करणे, ही मी माझी नैतिक जबाबदारी समजतो.” भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा मुंबईचे सचिव, गोविंद खरटमोल यांचे म्हणणे. त्यांचे म्हणणे खरेच आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुणीही गरजू रिकाम्या हाती परतलेला नाही.
गोविंद यांनी ‘श्रद्धा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून हजारो गरजूंची मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया विनामूल्य केली. परळच्या ‘बच्चू अली हॉस्पिटल’च्या माध्यमातून त्यांनी मुंबईत ११ वर्षांपूर्वी एक छोटे उपकेंद्र सुरू केले. आठवड्यातून दोनदा तिथे मोतीबिंदूग्रस्त लोकांच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. आवश्यक असल्यास मोतीबिंदूची शस्त्रक्रिया विनामूल्य केली जाते. दोन दशकापूर्वी गोविंद यांना त्यांच्या आईची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागले. गोविंद यांना वाटले, आईसाठी काहीही केले तरी तिचे ऋण फेडू शकत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे आपण आईची शस्त्रक्रिया करू शकलो. पण, ज्यांच्या घरी चूल पेटण्याची शाश्वती नाही, ते कसे शस्त्रक्रिया करणार? मग गोरगरिबांची सवलतीमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कुठे होईल? यासंदर्भात त्यांनी माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच मग ‘बच्चू अली हॉस्पिटल’ची माहिती मिळाली. आईच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सुरू झालेला प्रवास आज हजारो आयाबायांच्या डोळ्यातला अंधार प्रकाशून गेला.
कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मुळे गरिबांच्या घरची भाकरीही अदृश्य झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी विविध सेवायोजना, उपक्रम राबबिले. जनसेवा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे गोविंद यांना प्रेरणा मिळाली. मजूर संस्था तसेच, ‘विमा पॉलिसी’ आणि इतरही अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून कमावलेली संपत्ती अक्षरशः त्यांनी कोरोना काळात दीनदुबळ्यांमध्ये वाटली. दररोज हजारो गोरगरिबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
त्यांच्या सेवाभावी वृत्तीला भूतकाळाची किनार आहे. आता ते मुंबईमधील घाटकोपर उपनगरातील असल्फा येथे वास्तव्यास आहेत. पण, पूर्वी ते कुर्ला, सुंदर नगर येथे राहत होते. ती वस्ती कचरावेचक, कंत्राटी मजुरांची. गोविंद यांचे वडील धोंडीराम खरटमोल हे बिगारी कामगार, तर आई पद्मिनी कचरावेचक. खरटमोल कुटुंब मूळचे बीड अंबेजोगाईतले ढोर समाजाचे. उभयंतांना चार मूलं. त्यापैकी एक गोविंद. मुलांना वाईट वळण लागू नये, यासाठी खरटमोल दाम्पत्याने जमेल तितके प्रयत्न केले. लहानपणी शिक्षणाचा खर्च निघावा, म्हणून चौथीची परीक्षा दिल्यानंतर ते हॉटेलमध्ये स्वच्छतेचे काम करायचे.
गोविंद यांना नृत्य आणि संगीताची आवड. वस्तीत त्यांच्या मित्रांसोबत त्यांनी एक नृत्याचा ग्रुपदेखील तयार केला. त्यावेळी दूरदर्शनवर एक नृत्याचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे गोविंद आणि त्यांच्या मित्रांचे स्वप्न होते. त्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत केली. ‘ऑडिशन’साठी त्यांच्या ग्रुपला बोलावण्यातही आले. स्टुडिओत पोहोचण्याआधीच रांगेत उभे असताना तिथल्या काही लोकांनी त्यांच्या ग्रुपला हटकले. मुलांचे कपडे आणि साध्या प्लास्टिकच्या चपला पाहून ते मुलांना म्हणाले, “तुम भी डान्स करने आये हो? कहा कहा से आते हैं, भागो यहासे।’ मुलांना अक्षरशः हाकलून लावण्यात आले. त्यावेळी गोविंद यांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि मनात निर्णय की, आपण आयुष्यात असे काही तरी बनायचे की, कुणा गरिबाच्या मुलांची छोटीशी तरी इच्छा पुरी करू शकू. (आज गोविंद यांचा पुत्र साई हा टिव्ही मालिकांमध्ये अभिनेता आहे.) आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी कष्ट करणे गरजेचे होते.
 
हॉटेलमध्ये सफाई कामगार ते मुंबईच्या रस्त्यावर गटारात उतरून रोजंदारीवर सफाई कामगार म्हणूनही काम केले. ही सगळी कामं करताना त्यांच्या मनात हेच होते की, यापासून सुटका नाही. पण, आपण ही वेळ बदलवायची. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा परिस्पर्श त्यांना झाला. संघर्षाची सकारात्मक ठिणगी त्यांच्या मनात पेटली. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ते परिसरातील सह्याद्री मित्रमंडळाचे अध्यक्ष होते. मंडळाच्या माध्यमातून परिसरातील अतिक्रमण आणि इतर समस्यांचे त्यांनी निराकारण केले. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम, आत्मियता निर्माण झाली. पुढे ते राजकारणाच्या मैदानातही उतरले. भाजप पक्षाच्या विविध संघटनात्मक पदावर त्यांनी काम केले.
 
 
हे काम करतानाच त्यांनी समाजाचे काम करणे सोडले नाही. ते कक्कया समाजाचे प्रतिनिधित्व करतात. श्री संत वीरशैव कक्कया महाराजांचे धर्म नीतिमत्तेसंदर्भातले शूर आणि मानवताशील विचार समाजात आणखीन शक्तीने प्रस्थापित व्हावेत, यासाठी गोविंद काम करतात. ते कक्कया समाज मंदिर सुंदरबागचे पदाधिकारी आहेत. एकदा एका कार्यक्रमात त्यांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन ऐकले. त्यात ते म्हणाले की, “समाजात महापुरुष आणि संतविभूती जन्मले. समाजाने त्यांचा आदर्श लक्षात ठेवायला हवा.” हे ऐकून गोविंद यांना प्रकर्षाने वाटले की, आपल्या समाजाचे मानदंड आणि आराध्य श्री संत वीरशैव कक्कया महाराज आहेत. आपणही त्यांच्या आदर्श विचारांचा प्रसार करायला हवा.
 
समाजात कल्याणकारी उपक्रम राबवायला हवे. त्यातूनच पुढे मग शासनाने ‘संत वीरशैव कक्कया समाज विकास महामंडळा’ची निर्मिती करावी, ही मागणी पुढे आली. या महामंडळाची निर्मिती होऊन त्यातून कक्कया समाजाचा विकास व्हावा, हेच गोविंद आणि सहकार्‍यांचे लक्ष आहे. केंद्रात भाजप सरकार आहे. राज्यात आणि महानगरपालिकेतही भाजप सत्तेत आले, तर आपल्या कक्कया समाजाच्या मागण्या मान्य होतील, असे गोविंद यांचे म्हणणे आहे. ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’ हे प्रत्येकाच्याबाबतीत असते. पण, स्वत:ची इच्छा ही दुसर्‍याच्या इच्छापूर्तीत पूर्ण करण्याचे स्वप्न पाहणारे गोविंद खरटमोल हे केवळ कक्कया समाजाचेच सपुत्र नाहीत, तर शून्यातून विश्व निर्माण करू पाहणार्‍या सर्वच संघर्षवीरांचे प्रतिनिधी आहेत.
महामंत्री बनवा. तुमच्यासोबत कोण आले आहे? मी सांगितले मित्र आहे. तर महाजनसाहेबांनी मित्राला विचारलेतुम्ही संघटनेसाठी वेळ देऊ शकता ना? नंतर त्यांनी त्याला एक-दोन प्रश्न विचारले आणि महाजनसाहेब म्हणाले, “हे आजपासून तुमच्या प्रभागाचे महामंत्री.” प्रभागातला संघटनेचा पेच महाजनसाहेबांनी पाच मिनिटात सोडवला, तर अशा संस्कारात मी कार्यकर्ता म्हणून घडलो. महाजन साहेबांच्या संघटनशिस्तितला मी कार्यकर्ता आहे. माझे भाग्य की, आमच्या मतदारसंघाच्या खासदार आहेत, महाजनसाहेबांच्या कन्या पुनमताई महाजन. पुनमताई, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष शरद कांबळे यांच्या सहयोगाने समाजासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवतात. - गोविंद खरटमोल
 
@@AUTHORINFO_V1@@