कर्नाटकात व्हाट्सअँपवर पाकिस्तानचा झेंडा शेअर

एबीव्हीपीकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    09-Mar-2022
Total Views |

karnataka
 
बंगळुरू: कर्नाटकातील हिजाब वादाने उठलेले वादळ अजून शमते न शमते तोच आता एक नवीन वाद उफाळून आला आहे. कार्फनाटकातील शिवमोग्गा येथील ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअँप ग्रुप वर पाकिस्तानचा झेंडा शेअर झाला. त्यामुळे एकाच खळबळ माजली. या पाकिस्तानच्या झेंड्याला प्रत्युत्तर म्हणून काही विद्यार्थ्यांनी लगेच भारताचा झेंडा शेरा करायला सुरुवात केली. या विद्यार्थ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारणात येते आहे.
 
 
कॉलेजने या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतंत्र ग्रुपवर हा प्रकार घडला आहे. या ग्रोउपवासर पाकिस्ताचा झेंडा शेअर झाल्याची माहिती एबीव्हीपी कडून महाविद्यालयाला देण्यात आली. या विद्यार्थ्याला नोटीस पाठवली असून या विद्यार्थ्यांचा फोने बंद असल्याचे समजत आहे.