'देश सेवा परमो धर्म' : रमेश पोखरियाल यांची कन्या 'मेजर' श्रेयसी सिंह

    09-Mar-2022
Total Views |
 
 

bjp
 
 
मुंबई : महिला दिनाच्या औचित्यावर भाजपचे माजी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी श्रेयसी निशंक हिला कॅप्टन पदावरून मेजर पदावर बढती मिळाली आहे. आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या संबंधीतील माहिती रमेश पोखरियाल यांनी दिली.
 
'आजचा दिवस माझ्यासाठी खूप अभिमानाने भरलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यावर मुलगी श्रेयसी निशंक हिला भारतीय लष्करात मेजर पदावर बढती मिळाली आहे. देवभूमी उत्तराखंड ही शूर-मातृत्वाची भूमी आहे. येथे सरासरी, प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सैन्यात भरती होते आणि आपली सेवा देशासाठी समर्पित करते,' अशा भावना रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.
 
तसेच, 'देवभूमीची ही सुवर्ण आणि अभिमानास्पद परंपरा माझ्या मुलीने पुढे नेली याचा मला खूप आनंद आहे. आपल्या मुली जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाज आणि देशाला पुढे नेत आहेत' असेही मत पोखरियाल यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी देशातील सर्व कन्यांना देशाचे सैन्य तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना करिअर म्हणून निवडून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा अभिमान वाटावा यासाठी काम करावे असेही आवाहन केले.