प्रभादेवी स्थानकात प्रवाशांच्या जीवाशी खेळ

    07-Mar-2022
Total Views |
              
prabhadevi
मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी स्थनाकातून प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एल्फिस्टन रोड आताचे प्रभादेवी या स्थानकात पुन्हा एकदा पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्टेशन वर उभारलेली पाण्याची टाकी दिवसभर पानाने तुडुंब भरून वाहत असते. त्यात ज्या खांबावर ही टाकी उभी आहे तो खांबही गंजलेला आहे.केव्हाही ही पाण्याची टाकी खाली पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना रोज पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो. या पाण्याच्या नासाडी कडे प्रशासन दुर्लक्ष का करतेय? मोठी दुर्घटना झाल्याशिवाय प्रशासन ऐकणार नाहीये का? असे सवाल प्रवासी विचारत आहेत.
 
 
२०१७ साली एल्फिन्स्टन रोड चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती, त्यानंतर पश्चिम रेल्वेवर पुलंच्या देखभालीचे आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तरीही अशा प्रकारचे दुर्लक्ष होत रेल्वे प्रशासनाकडून होत असेल तर हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे अशीच प्रवाशांची भावना आहे. रेल्वे स्थानकांवरचे जुन्स्ट पूल ही अत्यंत गंभीर समस्या आहे आणि याकडे प्रशासनाकडून लक्ष दिले गेले पाहिजे अशी भावना प्रवाशांची आहे.