"ऑपरेशन गंगा भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक"

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात प्रतिपादन

    06-Mar-2022
Total Views |
 
 
               

narendra modi
 
 
 
 
पुणे: "रशिया- युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय वियार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी सुरु केलेले 'ऑपरेशन गंगा' हे भारतीय सामर्थ्याचे प्रतीक आहे" असे कौतुकोद्गार पंतप्रधान मोदी यांनी पुण्यात काढले. रविवारी मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलत असताना मोदी म्हणाले "जगातील इतर देशांना जे करता आले नाही ते भारताने करून दाखवले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या पूर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. देशातील नवी पिढी भाग्यवान आहे. आता ते पूर्वीच्या बचावात्मक राहण्याच्या काळात नाहीत."
 
 
 
या प्रसंगी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नानांची पाठराखण केली. ते म्हणाले " भारत आता अनेक क्षेत्रांत प्रगती करतो आहे. भारत हा मोबाईल उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे. पूर्वी आपण संरक्षण क्षेत्रात खूप आयात करायचो पण आता आपण आपली गरज भागवून निर्यात करण्या इतके सक्षम झालो आहोत." तरुणांबद्दल बोलताना देशातील तरुण ही देशाची ताकत आहे. सरकार नवी नवी क्षेत्रे तरुणांसाठी खुली करत आहे त्याच लाभ तरुणांनी घ्यावा.
 
 
 
पुणे मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यावर पंतप्रधानांनी मेट्रोतून सफर केली. या प्रसंगी स्वतः तिकीट काढून देशातील प्रत्येकाने नियमांचे पालन करणे किती मह्त्वाचे आहे हा संदेश आपल्या कृतीतुन दिला.