नवी दिल्ली: केंद्र सरकारने भारत सिरीज म्हणजे BH रेजिस्ट्रेशन नंबर करीत एक पायलट प्रोजेक्ट केला होता. त्याची आता संपूर्ण देशात अंमलबजावणी होणार आहे. या नंबरप्लेट्स मुळे वाहनचालकांना खूप मोठा फायदा होणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आता नंबरप्लेट बदलण्याची आता गरज लागणार नाही. कोठेही पोलीस या नंबरप्लेटच्या वाहनांना अडवू शकणार नाहीत.
ही कुठलीही व्हीआयपी सुविधा नसली तरी हा नंबर सामान्य नंबरपेक्षा वेगळा असेल. या नंबर प्लेटवर प्रथम चालू वर्षाचे शेवटचे दोन अंक लिहिले जातील.नंतर BH लिहिले जाईल आणि शेवटी चार अंकी क्रमांक लिहिला जाईल. ही एक पांढरी प्लेट असेल ज्यावर काळ्या रंगात अंक लिहिलेले असतील. या वाहनांमध्ये जर इलेकट्रीक वाहने असतील तर त्या वाहनांवर २ टक्के कर सवलत देण्यात आली आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बद्दल सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत या बदलनबाबत अधिसूचना पाठवली होती. ही नंबरप्लेट घेण्याची कुठेही सक्ती नाही, हे पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. या बदलामुळे देशातील रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर होऊन वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.