"राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय!" : केशव उपाध्ये

    31-Mar-2022
Total Views |

Keshav Upadhye
 
 
 
मुंबई : "मविआत काँग्रेसचे २५ आमदार नाराज, शिवसेनेचेही २५ आमदार नाराज, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच कोणावर नाराज नाही. मुख्यमंत्रिपद असूनही शिवसेना आमदारांना कुणी विचारत नाही. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय!", असे ट्विट करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीत वर-वर दिसणाऱ्या एकजुटीवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची आघाडीबद्दल असणारी मते, विविध कार्यक्रमांत त्यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या गोष्टी यासंदर्भात ते बोलत होते.
 
 
 
"उपमुख्यमंत्री तसेच अर्थ आणि गृहनिर्माणसारखी खाती राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय. सध्या शिवसेना आणि काँग्रेसची आघाडीतली अवस्था 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे. जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार?", असे त्यांनी पुढे म्हटलं आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईला उद्देशून, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी; बाकीसगळे फिरू दे दारोदारी' असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.