मुंबई : "मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात ध्वनीप्रदूषण संदर्भात अतिशय चांगले अभियान चालवले आहे. मात्र यालाच जोडून आणखी एक विषय म्हणजे मुंबईत मशिदींवर अनेक बेकायदेशीर भोंगे लावण्यात आले आहेत, त्यांच्यावरही योग्य कारवाई करून ते उतरवण्यात यावेत.", अशी मागणी मंगळवारी मोहित कंबोज यांनी एका व्हिडीओमार्फत केली.
"आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही किंवा आम्हाला कोणाच्या भावनाही दुखवायच्या नाहीत. अजान नियमित करावी, पण मशिदींच्या आत. कारण मशिदींवर लावलेल्या बेकायदेशीर भोंग्यांमुळे ध्वनिप्रदुषण होत आहे आणि त्याचा त्रास अभ्यास करणारी मुलं, वयस्कर नागरिक, हार्ट पेशंट अशा अनेकांना होत आहे. पूर्वी घड्याळ नसल्याने नमाज पडण्याची वेळ कळावी यासाठी भोंग्यांमधून अजान व्हायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर भोंग्यांवर संजय पांडे यांनी योग्य ती कारवाई करावी.", असे कंबोज यावेळी म्हणाले.