ठाणे: सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृह परिसरात 'ठाणे मुक्ती दिन' साजरा करण्यात रविवारी साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आ. संजय केळकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. गेली आठ वर्षे सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृहात २७ मार्च रोजी ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात येतो. २७ मार्च १७३७ या दिवशी मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतला होता त्याच पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
या दिनानिमित्त कारागृह परिसरातील तोफांना तोफागाडे बसवण्यात आले. अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हाध्यक्ष महेश विनेरकर यांनी दिली. यावेळी या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, रायगड मंडळाचे सचिव श्री. थोरात, कारागृहाचे अधिक्षक हर्षद अहिरराव आदींसह शेकडो दुर्गसेवक व ठाणेकर नागरिक उपस्थित होते.